
नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Met Gala 2025 साठी यंदा देखील भारतीय ब्रँड ‘Neytt’ ने कार्पेट तयार करून ऐतिहासिक परंपरा जपली आहे. केरळच्या अलप्पुझा येथे स्थित असलेल्या ‘Neytt’ ब्रँडने सलग तिसऱ्यांदा Met Gala साठी ६३,००० चौरस फूट क्षेत्रफळाचा निळसर कार्पेट तयार केला आहे.