

ketaki kulkarni
ESAKAL
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' सध्या प्रेक्षकांची वाहवा मिळवतेय. या मालिकेची कथा आणि मालिकेतील कलाकार दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत. त्यामुळेच टीआरपी यादीत ही मालिका झी मराठी वाहिनीवर टॉपला आहे. या मालिकेतील एक गाजलेलं पात्र म्हणजे कनिका. ती मालिकेत नकारात्मक भूमिकेत आहे. ती मालिकेत कमळीला त्रास देते. त्यामुळे प्रेक्षक तिला ट्रोल करताना दिसतात. मात्र खऱ्या आयुष्यात तिला यासगळ्याचा त्रास होतो असं ती म्हणालीये. मालिकेत कनिकाची भूमिका 'केतकी कुलकर्णी हिने साकारली आहे.