
छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत नवीन घरात प्रवेश केला. त्यात प्राजक्ता माळी, विजय आंदळकर, सई ताम्हणकर, ऋतुजा बागवे, केतकी माटेगावकर, विवेक सांगळे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. तर काही कलाकारांनी शहरांच्या बाहेर जागा घेत आपलं टुमदार असं फार्महाउस देखील बांधलंय. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचा समावेश झालाय. 'जय मल्हार' मालिकेतील खंडोबा म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे याने खंडोबाच्या नगरीत स्वतःचं घर बांधायचं ठरवलं आहे.