

KHUSHBOO TAWADE
ESAKAL
'सारंकाही तिच्यासाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री खुशबू तावडे सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. तिने वर्षभरापूर्वीच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. आता ती तिच्या सासरी रमली आहे. खुशबू सध्या आपल्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देताना दिसतेय. मात्र अशातच ती सोशल मीडियावर सक्रीय असते. सोबतच ती तिचा युट्यूब चॅनेलदेखील चालवते. ज्यामार्फत ती अनेकदा व्लॉग करत असते. यातून ती तिच्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडी शेअर करताना दिसते. आताही तिने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.