किंग खान शाहरुखला वाटते पत्नी गौरीची भीती?

“जे नातं चार भिंतींच्या आत असतं, ते नातं बाहेर कोणीचं समजू शकणार नाही. काही जण हा विचार करत असतील की, मी घाबरतो, तर ठीक आहे त्यात मी खूश आहे.
King Khan Shah Rukh open up on relationship with his wife gauri
King Khan Shah Rukh open up on relationship with his wife gauriSakal

बॉलिवूडचा बादशाह किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची लव्हस्टोरी अगदी फिल्मी गोष्टीसारखीच आहे. गौरी आणि शाहरुख बॉलिवूडमधलं लोकप्रिय कपल आहे. दोघांना आदर्श कपलही मानलं जातं.

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी तरुण वयात भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. दोघंही दिल्लीमध्ये एका पार्टीत भेटले होते आणि त्यावेळेस ते पाच मिनिटांसाठी एकमेकांशी बोलले आणि नंतर शाहरुखला गौरीचा नंबर मिळाला.

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी १९९१ मध्ये लग्न केलं. आधी गौरीच्या आई-बाबांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं, कारण शाहरुख मुस्लिम होता, पण शेवटी प्रेम जिंकलं आणि दोघंही आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार झाले. आता शाहरुखची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या मुलाखतीदरम्यान शाहरुख खानला विचारलं गेलं होतं की, तो त्याची पत्नी गौरीला घाबरतो का?

या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला होता, “तुम्हाला ही गोष्टच माहीत नसू शकते, जर तुम्ही माझी पत्नी असता तरच तुम्हाला हे कळलं असतं. दोन जणांचं जे नातं असतं, मग ते पती-पत्नीचं असूदे किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड ते त्यांचं वैयक्तिक असतं. मग बाहेरचा कोणताही माणूस ते नातं समजूच शकणार नाही.”

शाहरुख पुढे म्हणाला, “जे नातं चार भिंतींच्या आत असतं, ते नातं बाहेर कोणीचं समजू शकणार नाही. काही जण हा विचार करत असतील की, मी घाबरतो, तर ठीक आहे त्यात मी खूश आहे. कोणाला वाटत असेल की, मी तिच्यावर खूप प्रेम करतो; जे आमच्यामध्ये आहे ते फक्त आम्हालाच माहीत आहे, ते सांगूनपण लोकांना कळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com