
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड याला हळद लागलीये. 'देवमाणूस' या मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आता प्रेक्षकांचा लाडका किरण चढायला सज्ज आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा आणि हळद पार पडलीये. त्यांच्या हळदीला तर मित्रमंडळींनी चांगलाच कल्ला केलाय. त्यांचे काही फोटोही चाहत्यांमध्ये व्हायरल झालेत. नेटकरी आता त्याला शुभेच्छा देत आहेत. आज १४ डिसेंबर रोजी किरण बोहोल्यावर चढणार आहे.