
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे मराठी अभिनेते म्हणजे किरण करमरकर. किरण यांनी लोकप्रिय हिंदी अभिनेत्री रिंकू धवन हिच्याशी लग्न केलेलं. किरण यांनी 'कहानी घर घर की' मध्ये तुलसीच्या पतीची भूमिका साकारली होती जी प्रचंड गाजली. याच मालिकेत त्यांच्यासोबत रिंकूदेखील होती. याच सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या सवयी, छोट्या छोट्या गोष्टींवरून समजून घेणं हे सगळंच त्या दोघांनाही आवडू लागलं. पुढे त्यांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला. आता हा दुरावा का आला याबद्दल रिंकू यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.