

करीना कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. करिनाने अभिनेता सैफ अली खान याच्याशी लग्नगाठ बांधलीये. करीना सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर चर्चेत होती. लग्नानंतर करीना पतौडी कुटुंबाची सून बनली. करीना हिंदू आहे आणि सैफ मुस्लिम आहे, त्यामुळे अभिनेत्री कोणत्या धर्माचे पालन करते, हिंदू की मुस्लिम असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडतो. आता ती कोणत्या धर्माचं पालन करते हे समोर आलंय. तैमूर आणि जेह यांची नॅनी ललिता डिसिल्वा हिने याबद्दल सांगितलंय.