Kon Mhanta Takka Dila
Kon Mhanta Takka DilaSakal

Kon Mhanta Takka Dila : रंगभूमीवर येतेय ‘कोण म्हणतं टक्का दिला?’  

अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे व पल्लवी वाघ-केळकर या कलावंतांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता रंगभूमीवर येत आहे.

Kon Mhanta Takka Dila : अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे व पल्लवी वाघ-केळकर या कलावंतांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता रंगभूमीवर येत आहे.

‘नवनीत प्रॉडक्शन’ निर्मित व ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’ प्रकाशित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवारी (ता. २२) गडकरी रंगायतन येथे होणार आहे. नाटकाचे लेखन संजय पवार यांनी केले असून, सुबोध पंडे हे दिग्दर्शक आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, अजित परब यांचे संगीत व मंगल केंकरे यांची वेशभूषा लाभली आहे.

मृणालिनी पंडे, वैभव पाटील व अमोल परब हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. नितीन नाईक व दीपक जोशी हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. या नाटकातल्या भूमिकेविषयी अनिकेत विश्वासराव म्हणाला, ‘‘माझ्या भूमिकेचा बोलण्याचा लहेजा गावरान आहे आणि त्याची सलगता कायम ठेवणे हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com