
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिला 'कोंबडी पळाली' या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली. 'माझा नवरा तुझी बायको', 'फक्त लढ म्हणा', 'जत्रा', 'करार', 'फूल ३ धमाल' या चित्रपटात क्रांतीने वाखाणण्याजोगं काम केलंय. ती इंडस्ट्रीमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. सध्या क्रांती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने तिचा महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय. मांजरेकरांनी 'लालबाग परळ' या चित्रपटातली तिची भूमिकाच काढून टाकली असं ती म्हाणालीये.