

krushnaichya leki
esakal
छोट्या पडद्यावर लवकरच काही नवीन मालिका सुरु होतायत. त्यातलीच एक मालिका म्हणजे झी मराठीवरची 'कृष्णाईच्या लेकी' ही मालिका. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या तीन लेकीची दिसणारा आहेत. अशात आता कृष्णाईच्या मोठ्या लेकीने निवेदिता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय. मालिकेत अभिनेत्री एकता लब्दे कृष्णाईची मोठी मुलगी शारदा हे पात्र साकारणार आहे. एकता यापूर्वी ''विठू माउली' या मालिकेत रुख्मिणीच्या भूमिकेत दिसली होती. ‘कृष्णाईच्या लेकी’ मधील शारदा ही समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या भावनांनाही बाजूला ठेवणारी मुलगी असून, या भूमिकेद्वारे एकता प्रेक्षकांसमोर एका नव्या रूपात येत आहे.