

KRUSHNAICHYA LEKI
ESAKAL
गेल्या काही दिवसात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. स्टार प्रवाहने दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ झी मराठीनेदेखील एका मालिकेची घोषणा केली. ही मालिका म्हणजे 'कृष्णाईच्या लेकी'. या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. आता या मालिकेची स्टारकास्ट आणि वेळ समोर आलीये. त्यावरून आता कोणती मालिका निरोप घेतेय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.