
लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्षिती जोग हिने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. ती लवकरच 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत क्षितीने तिच्या परफ्युमच्या आवडीबद्दल सांगितलंय. तिला परफ्युम लावायला खूप आवडतं मात्र ती प्रत्येक सिनेमाच्या वेळेस वेगळा परफ्युम लावते. वेगवेगळ्या भूमिकांसाठी ती वेगवेगळे परफ्युम लावते. याच मुलाखतीत तिने यामागचं कारणही सांगितलंय.