Antarpaat : घटस्फोट नाही तर गौतमी-क्षितिजमध्ये खुलणार मैत्रीचं नातं ; मालिकेत आलं नवं वळण

Antarpaat Serial Twist : कलर्स मराठीवर नवीनच सुरु झालेल्या अंतरपाट मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.
Antarpaat Serial New Twist
Antarpaat Serial New TwistEsakal

Colors Marathi : कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या लोकप्रिय मालिकेत गौतमी आणि क्षितिजचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. त्यांचा विवाह विशेष सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या विशेष सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्षितिज गौतमीला त्याचं जान्हवीवर प्रेम असल्याचं सत्य सांगितलं आणि गौतमीकडे घटस्फोटाची मागणी केली. पण गौतमीने त्याला डिव्होर्स देणं नाकारलं आहे. पण आता गौतमी आणि क्षितिजचं नातं नवीन वळण घेणार आहे.

Antarpaat Serial New Twist
Rashmi Anpat: 'शाब्बास सूनबाई'चा कडक मराठमोळा लूक काळजाचा ठोकाचं चुकवतोय

क्षितिजचं गौतमीसोबत लग्न झालेलं असलं तरी त्याच्या मनात अजूनही पूर्वीची प्रेयसी जान्हवीची जागा कायम आहे. जान्हवीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे त्याच्या मनात पक्के आहे. तरीसुद्धा, गौतमीने या नात्यात मैत्रीचे बीज पेरण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच क्षितिजने सत्य सांगितल्यानंतरही गौतमीने धीर सोडलेला नाही.

मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. क्षितिज गौतमीने पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारेल का ?

पहा प्रोमो

गौतमी आणि क्षितिजच्या मैत्रीचं नातं त्यांच्या आयुष्यात एक नवा रंग भरणार आहे. गौतमीने क्षितिजला दिलेला हा मैत्रीचा हात त्यांच्या नात्याला एक नवी दिशा देणार आहे. गौतमी आणि क्षितिज लग्नबंधनात अडकल्याने त्यांच्यात पती-पत्नीचं नातं निर्माण झालंय. पण त्यासोबत ते इतर नात्यांतही अडकले आहेत. ही सगळी नाती जपणं गौतमी आपलं कर्तव्य मानते. तिने अत्यंत सकारात्मक पद्धतीने या लग्नाचा स्वीकार केलेला मालिकेत पाहायला मिळेल.

Antarpaat Serial New Twist
Antarpaat Colors Marathi Serial : अभिनेत्री रश्मी अनपट दिसणार 'अंतरपाट' मालिकेत; प्रोमोची होतेय चर्चा

गौतमी आणि क्षितिजच्या नात्यातील हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच भावेल. त्यांच्या या नव्या, सुंदर नात्याची झलक पाहा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. पाहा 'अंतरपाट' दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com