Ladki Bahin Marathi Movie: ‘लाडकी बहीण’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Release Date and Production Details: लाडकी बहीण’ हा सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित मराठी चित्रपट १७ एप्रिलपासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत असून सामान्य महिलांच्या आयुष्यातील संघर्ष, कुटुंबातील नातेसंबंध आणि परस्पर सहकार्य यांचे चित्रण विनोदी व भावनिक पद्धतीने करण्यात आले आहे.
समाजातील घडामोडींवर आधारित कथानकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्माण होताना दिसतात. अशाच एका सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.