
गेल्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीने अनेक हरहुन्नरी कलाकार गमावले. त्यातील अनेकांचं निधन कर्करोग आणि हृदय विकाराच्या झटक्याने झालं. कामात हे कलाकार इतके व्यग्र असतात की त्यांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. आणि त्याचाच परिणाम हा त्यांच्या तब्येतीवर दिसून येतो. असाच अनुभव 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्याने देखील घेतला. वर्षभरापूर्वी त्याने खूप मोठ्या गंभीर आजाराचा सामना केला आणि त्यात त्याच्या मदतीला त्याचे सगळे मित्र धावून आले. एका पोस्टमध्ये त्याने सगळ्यांचे आभार मानत आपल्यासोबत काय घडलेलं ते सांगितलंय.