
मागची काही वर्ष मराठी कलाकारांसाठी चांगली ठरली. काहींनी स्वतःचा व्यवसाय सूरू केला तर काहींनी स्वतःचं फार्महाउस घेतलं. कुणी स्वतःचं हॉटेल सुरू केलं तर कुणी स्वतःचं हक्काचं घर घेतलं. साई ताम्हणकर ते प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे ते ज्ञानदा रामतीर्थकर या कलाकारांनी देखील मुंबई आणि ठाण्यात आपलं हक्काचं घर घेतलंय. अशातच आता आणखी एका लोकप्रिय कलाकाराने मुंबईत आपलं हक्काचं घर घेतलंय. हा अभिनेता आहे विवेक सांगळे. त्याने ज्या ठिकाणी त्याच्या वडिलांची मिल होती तिथेच त्याचं नवीन घर खरेदी केलंय. त्यामुळे त्याच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय.