'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील जिवाला मोठा धक्का; अचानक सस्पेंड झालं इंस्टाग्राम अकाउंट; हे आहे कारण, म्हणतो-

MARATHI ACTOR VIVEK SANGLE INSTAGRAM CONTROVERSY: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता विवेक सांगळे याचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद करण्यात आलंय.
VIVEK SANGLE

VIVEK SANGLE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता विवेक सांगळे याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या विवेक लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो या मालिकेत जीवाची भूमिका साकारतोय. मात्र विवेक सांगळेला मोठा धक्का बसलाय कारण इंस्टाग्रामने अचानक त्याचं अकाउंट बंद केलंय. त्याचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय. विवेकने याबद्दल अपीलदेखील केलं आहे. आता या घटनेला ६५ दिवस झालेत. मात्र त्याच्या अपिलावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विवेकने ३ जानेवारी २०२६ रोजी अकाउंट परत मिळवण्यासाठी मेटाकडे अपील केलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com