
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका बनतेय. मालिकेची कथा आणि मालिकेतील कलाकार यामुळे प्रेक्षक आवर्जून ही मालिका पाहतात. त्यात काव्या आणि नंदिनी यांच्या चाहत्यांचं देखील त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. आता मालिकेत काव्याने नवीन सुरुवात केली आहे. आता नवीन आलेल्या प्रोमोमध्ये काव्याच्या अडचणी संपून नंदिनीसमोर मोठं संकट उभं राहिलंय. नंदिनीच्या हातून मोठी चूक होणार आहे.