LAGNANANTR HOILACH PREMESAKAL
Premier
असा शूट झाला छातीवरील टॅटू जाळण्याचा सीन; जिवा म्हणाला, 'ते लाकूड खरंच पेटलेलं होतं पण...
LAGNANANTR HOILACH PREM BEHIND THE SCENE: 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत नुकताच जिवाच्या छातीवरचा काव्याचा टॅटू मिटवण्याचा सीन नुकताच शूट झालाय.
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येत आहेत. जिवा आणि काव्या यांचं प्रेम आणि दुसऱ्याच कुणाशी तरी झालेलं लग्न यामुळे ही मालिका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली. ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. एकीकडे जिवा आणि काव्या यांच्या नात्याचा गुंता वाढतोय. जिवा नंदिनीला काहीही समजू नये म्हणून प्रयत्न करतोय. तर दुसरीकडे काव्या त्याला आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगण्यासाठी सांगतेय. अशातच मालिकेचा एक मोठा सीन शूट करण्यात आला. यात जिवाने काव्याचा तिच्या छातीवरचा टॅटू जाळला. आता त सीन कसा शूट झाला याबद्दल जिवाने सांगितलंय.