

lagnanatr hoilch prem
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये आता नवनवीन ट्विस्ट येत आहेत. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेने काही महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर ही मालिका स्लॉट लीडरदेखील ठरली. टीआरपी यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणारी ही मालिका आता हटके कथानकामुळे चर्चेत आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी महाखुलासा दाखवण्यात आला. यात जीवा आणि काव्याने आपलं अफेअर घरच्यांपासून लपवलेलं ते रम्या आणि वसू आत्याने सगळ्यांसमोर आणलं. मात्र त्यामुळे पार्थ आणि नंदिनी दुखावले. आता जीवा आणि काव्या त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.