
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असणारी मालिका म्हणजे 'लग्नानंतर होईलच प्रेम'. या मालिकेचं कथानक, मालिकेतील पात्र आणि त्यांचे अभिनय हे सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. मात्र सध्या मालिकेत वेळच ट्रॅक सुरू आहे. प्रेक्षकांना मालिकेत काव्या आणि नंदिनी यांचं बहिणीचं प्रेम पाहायचंय. तर त्या दोघींचा सुखी संसार पाहायचाय. मात्र असं असूनही मालिकेचं कथानक भलत्याच दिशेला गेलं आहे. त्यामुळे मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी आता मानिनीवर रागावले आहेत.