
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' ने फार कमी दिवसात प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यातील मुख्य कलाकारदेखील प्रेक्षकांचे आवडते आहेत. मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेत नंदिनी आणि जीवाची जोडी दाखवण्यात आली आहे आणि काव्या आणि पार्थची जोडी दाखवण्यात आलीये. आता मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक भलतेच खुश झालेत. काव्या आणि जीवा आपापल्या पतीला आणि पत्नीला मनवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत.