
झी मराठीवरील मालिका 'लाखात एक आमचा दादा' यात भाऊ आणि बहिणीचं नातं दाखवण्यात आलंय. ही मालिका तिच्या आगळ्यावेगळ्या कथानकामुळे चर्चेत असते. यातील सूर्या दादा आणि तुळजाची जोडी प्रेक्षकांना भावलीये. सध्या या मालिकेत नवीन ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे. मालिकेत लवकरच डॅडींचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर तेजूसाठी सूर्या रौद्रावतार धारण करणार आहे. मात्र सूर्याच्या या अवतारामुळे तो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झालाय.