
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये सध्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. लक्ष्मी आणि निवास यांची धाकटी मुलगी जान्हवी हिचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय.लग्नात अनेक घडामोडी घडल्या. मात्र ऑनस्क्रीन सोबतच ऑफस्क्रीनदेखील हा विवाहसोहळा कलाकारांनी एन्जॉय केला. मालिकेतील कलाकारांचा शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते सगळे 'गोमू तुझे गजऱ्याचा' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.