

lakshmi niwas new promo
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये मोठी स्पर्धा आहे. टीआरपी वाढवण्यासाठी या मालिका कायम नवनवे ट्विस्ट आणताना दिसतात. त्यात 'बिग बॉस मराठी ६' सुरू झाल्याने त्यांच्यापुढील आव्हान आणखी वाढलंय. आता झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील मालिका आणखी जोर लावत मालिकांचा टीआरपी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. अशातच आता झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेतदेखील नवीन ट्विस्ट येणार आहे. अनेक दिवसांपासून जयंतीपासून लपून असणारी जान्हवी अखेर त्याच्यासमोर येणार आहे.