
लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला 'धर्मवीर' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याचा आनंद दिघे यांच्या रूपातील लूकपाहून प्रेक्षक भारावले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदललं. या चित्रपटात 'लक्ष्मी निवास' मालिकेतील अभिनेताही झळकलाय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केलंय.