
छोटा पडदा हे एक असं माध्यम आहे ज्यामुळे कलाकार फार कमी कालावधीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. कमी काळात प्रचंड लोकप्रियता या माध्यमातून मिळते. घराघरातले प्रेक्षक आपला चेहरा ओळखू लागतात. त्यामुळेच चाहत्यांच्या मनात आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. त्यांचं राहणीमान, त्यांचं जेवण इथपासून ते त्यांचं दिसणं, मेकअप प्रोडक्ट, कपडे सगळीच स्टाइल चाहते कॉपी करतात. मात्र बऱ्याचदा कलाकार चांगलं दिसण्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट करून घेताना दिसतात. असंच 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतील एका अभिनेत्याने आपण केसांसाठी हेअर पॅच वापरत असल्याचं सांगितलं आहे.