

'लक्ष्मी निवास' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षक प्रचंड मोठा आहे. या मालिकेत सध्या वेगवेगळे प्लॉट सुरू आहेत. त्यात जयंत आणि जान्हवी यांचाही एक प्लॉट आहे. मालिकेत जयंतीच्या विचित्र वागण्याला काहीही सीमा नसल्याचं दाखवण्यात आलंय. जयंत संशयी तर आहेच सोबतच तो खूप विक्षिप्तदेखील वागतो. त्यामुळे त्याचा त्रास जान्हवीला होताना दिसतो. मात्र जान्हवीदेखील प्रत्येकवेळी जयंतला माफ करून त्याच्यासोबत राहायला तयार होते. आता जयंतचं आणखी एक सत्य जान्हवीसमोर उघड होणार आहे.