

most profit making film in 2025
esakal
भारतीय सिनेमासाठी २०२५ हे वर्ष खरोखरच ऐतिहासिक वर्ष ठरलं. या वर्षात अनेक मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. हिंदी चित्रपटसृष्टीत 'सैयारा', 'एक दीवाने की दीवानियत' आणि 'तेरे इश्क में' या चित्रपटांच्या यशामुळे पुन्हा एकदा रोमान्सचा काळ परतल्यासारखं वाटलं. दुसरीकडे 'धुरंधर' आणि 'छावा' यांसारख्या चित्रपटांनी ॲक्शनचा धडाका लावला, तर दक्षिणेकडील 'कांतारा चॅप्टर वन'ने यशाचं नवं शिखर गाठलं. मात्र, आश्चर्य म्हणजे या सर्व बड्या चित्रपटांना मागे टाकत वर्षातील सर्वात मोठा हिट ठरण्याचा मान एका छोट्याशा गुजराती चित्रपटाने मिळवला आहे.