

last stop khanda
esakal
सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटातून प्रेमाचा एक भावनिक आणि विनोदी ड्रामा उलगडणार आहे. उत्तम लेखन, कसदार अभिनय आणि कर्णमधुर संगीत असलेला, प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, नुकताच त्याचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.'प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' उलगडणारा 'लास्ट स्टॉप खांदा' नावापासूनच चर्चेत आहे. यातील 'शालू झोका दे गो मैना' या गाण्यासह टायटल साँग आणि टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.