
'माहेरची साडी' चित्रपटातून घराघरात पोहोचलेले अभिनेते रमेश भाटकर यांनी ९०चा काळ गाजवला. त्यांचा अभिनय हा सगळ्यांना पुरून उरणारा होता. त्यांनी अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टी गाजवली. मात्र सगळ्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा १७ वर्षीय अभिनेत्रीने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. या प्रकरणावर आता रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. तेव्हा मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला जाब विचारलेला असं त्या म्हणाल्यात.