
'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेने अक्षरा आणि अधिपतीला प्रचंड प्रेम मिळवून दिलं. अतिशय वेगळ्या अशा विषयावर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल २ वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका ऑफ एअर झाली. या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीसोबत भुवनेश्वरी, चारुहास, दुर्गेश्वरी हे सगळेच घराघरात लोकप्रिय झाले. मात्र आता मालिकेतील चारुहास यांनी शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.