

laxmikant berde
esakal
मराठी सिनेसृष्टी ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे ते म्हणजे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. तितकाच हसरा आणि तितकाच गंभीर अभिनय करणारे लक्ष्मीकांत कायम आपल्या सहकलाकारांना मान द्यायचे. त्यांच्याशी नीट वागायचे. इतरांना काम कसं मिळेल याकडे त्यांचं लक्ष असायचं. मात्र जेवढे ते प्रेमळ होते तितकेच कामाच्या बाबतीत शिष्टप्रिय होते. याच शिस्तीसाठी त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. तो अभिनेता होता विजय पाटकर. आपल्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे विजय पाटकर यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.