

VIJAY PATKAR ON LAXMIKANT BERDE
ESAKAL
मराठी चित्रपटसृष्टी म्हटली की सगळ्यात आधी नाव येतं ते लक्ष्मीकांत बेर्डे. प्रेक्षकांचा लाडका लक्ष्यामामा या जगातून जरी खूप लवकर गेला असला तरी त्यांनी केलेलं काम अफलातून आहे. आजही प्रेक्षक आवडीने त्यांचे चित्रपट पाहतात. प्रेक्षकांच्या मनात आजही त्यांची छबी कायम आहे. ते वेळेचे पक्के होते. सेटवर वेळेत जाण्यापासून सगळी कामं व्यवस्थित करणं त्यांना आवडायचं. मराठी अभिनेते विजय पाटकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा सांगितला आहे जेव्हा मामांनी विजय यांच्या कानाखाली मारलेली. तेव्हा नेमकं काय घडलेलं?