
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून लोकप्रिय असलेले लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची आणि वैयक्तिक आयुष्याची कायमच चर्चा होत आलोय. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेलं. आजही ते स्थान तसंच कायम आहे. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांना पोटधरून हसवलं. मात्र विनोदाचा हा बादशाह त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र दुःख सहन करत राहिले. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला गमावलं होतं. त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं.