
वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं. आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी 'दुनियादारी' चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत काम केलंय. त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटात काम केलं. एका मुलाखतीत वर्षा यांनी लक्ष्मीकांत यांच्या मनातली ती इच्छा सांगितली जी कधीही पूर्ण झाली नाही.