

छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. काही मालिकांची कथा प्रेक्षकांना आवडते. तर काही मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात. हे कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडतात.. त्यामुळेच प्रेक्षकही त्या कलाकारांशी जोडलेले राहतात. मात्र हे कलाकार मालिका सोडून गेले तर त्याचा मोठा फटका त्या मालिकेला बसतो. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहावरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता तिच्या पाठोपाठ झी मराठीवरील अभिनेत्रीने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे.