Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी ही घटना घडली. त्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कस्पटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर तपासात मोठे तितकेत धक्कादायक , संतापजनक असे खुलासे झाले. हगवणे कुटुंबातल्या अनेकांनी तिचा मानसिक, शारिरीक छळ करून तिचा जीव घेतलाय. त्यानुसार वैष्णवीचा पती, सासू, सासरा, नणंद, दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. मात्र वैष्णवी प्रमाणे मराठी अभिनेत्रींनाही सासरी छळ सहन करावा लागला होता.