
२०२४ हे वर्ष लग्नसोहळ्यांनी गजबजलेलं राहिलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अनेक कलाकारांनी यावर्षी त्यांचे लाईफ पार्टनर निवडले तर काहींनी मोठ्या प्रतिक्षेनंतर आपल्या नात्याला लग्नाचं स्वरुप दिलं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंड : यावर्षी सगळ्या बॉलीवुड कलाकारांनाही मागे टाकत यावर्षी सगळ्यात चर्चेत राहिलं ते अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचा लग्नसोहळा. कारण या लग्नसोहळ्यात अख्ख बॉलीवुडचं नाही तर हॉलीवुडही हजर होतं. या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम ग्रँड पद्धतिने पार पडले होते. प्री-वेडिंग कार्यक्रमापासून या सोहळ्याला सुरुवात झाली होती, वर्षभर या लग्नाचे विविध कार्यक्रम आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरले. मार्च महिन्यात जामनगरमध्ये प्री-वेडिंग लग्नसोहळा पार पडला जिथे अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. ग्लोबल फेम गायिका रिहानाने या सोहळ्यासाठी परफॉर्म केलं. तर मुंबईतल्या अंबानींच्या अँटिलिया या राहत्या घरी जुलै महिन्यात लग्नाचे विधी सोहळे पार पडले. या सोहळ्यासाठीही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज आणि मान्यवरांची हजेरी पाहायला मिळाली होती. अनेक मोठे बॉलीवुड कलाकारा अनंतच्या लग्नाच्या वरातीत नाचतानाही दिसले. शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित नेने, प्रियांका चोप्रासह अनेक बड्या कलाकारांनी या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. आंतरराष्ट्रीय लोकप्रिय गायक जस्टीन बीबरने संगीत कार्यक्रमात हजेरी लावली आणि खास गाणी देखील सादर केली होती. तर डब्ल्यू डब्ल्यू एफ स्टार जॉन सीना देखील या लग्नसोहळ्यासाठी हजर होता. अनेक उद्योगपतींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या ग्रँड विवाहसोहळ्यात सहभागी झाले होते. अनंत आणि राधिकाचा हा विवाहसोहळा वर्षभर चर्चेचा विषय ठरला.