

LOVE LOTTERY MOVIE REVIEW
esakal
नातं म्हटलं की त्यात प्रेम, विश्वास, अपेक्षा आणि कधी कधी गैरसमजही निर्माण होतात. दोन माणसं एकमेकांच्या जवळ येतात. संसार सुरू करतात; पण काळ बदलतो. परिस्थिती बदलते आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. अशाच नात्यांमधील गुंतागुंत, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि सत्याचा शोध घेणारा ‘लव्ह लॉटरी’ हा चित्रपट दिग्दर्शक अरविंद पांडे यांनी आणला आहे. चित्रपटाची कथा डेहराडून येथे घडणारी आहे. कार्तिक सक्सेना (अक्षय ओबेरॉय) आणि भरनी वर्मा (हेली दारूवाला) यांच्याभोवती ही कथा फिरते. त्या दोघांची भेट होते आणि हळूहळू या भेटीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. प्रेमानंतर दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. सुरुवातीला सुखी वाटणारं त्यांचं नातं मात्र लग्नानंतर बदलू लागतं. दोघांमधील विश्वास कमी होतो. तणाव वाढत जातो आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.