

madhavi nemkar
esakal
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. स्टार प्रवाहावरील याच मालिकेने तिने ओळख मिळवून दिली. मालिका संपूनही ती आजही चाहत्यांमध्ये शालिनी म्हणून लोकप्रिय आहे. माधवी सध्या शोषक मीडियावर चर्चेत आहेत. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र आता माधवीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने तिच्या दुसऱ्या घराची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने मुंबईत दुसरं घर घेतलंय.