
सिनेइंडस्ट्री बाहेरून झगमगाटी दिसत असली तरी त्यातील स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. इथे टिकून राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. सोबतच खिशात पैसे किंवा कुणाचीतरी आर्थिक सोबतही असावी लागते. अनेक कलाकार या क्षेत्रात येण्यापूर्वी नोकरी करत होते. आपल्या नोकरीमधून आलेले पैसे ते मुंबईत टिकून राहण्यासाठी वापरतात. लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर हिनेदेखील तिच्या सुरुवातीच्या काळामधील वाईट अनुभव सांगितला आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी केलेल्या नोकरीत माधवीला वाईट अनुभव आला होता.