
MADHAVI NIMKAR
ESAKAL
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. शालिनी असं म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर माधवी उभी राहते. आता सगळ्यांना रागीट माधवी दिसते. मात्र माधवीने अगदी शून्यापासून संपूर्ण विश्व निर्माण केलं. ती लहानश्या खेड्यातून आली होती. त्यामुळे सुरुवातीला तिला सगळ्यांनीच कमी लेखलं अगदी तिच्या नातेवाईकांनीदेखील तिला ऐकवलं होतं. माधवीने नुकतीच मज्जा पिंकला मुलाखत दिली. यात तिने याबद्दल सांगितलं आहे.