

marathi actress farm house
esakal
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या वाढदिवसाला शेतात काम करत असल्याचे काही फोटो शेअर केले होते. तिने तिच्या वाढदिवसाला चक्क भात लावणी केली होती. फक्त प्राजक्ताच नाही तर मृण्मयी देशपांडे देखील महाबळेश्वरच्या तिच्या घरी शेती करताना दिसते. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जी तिच्या फार्म हाऊसच्या आवारात गेली काही वर्ष शेती करतेय आणि वेगवेगळी फळं देखील पिकवतेय. अगदी डाळ आणि तांदळाची लागवडही ती तिथेच करतेय. आता एक व्हिडिओ शेअर करत तिने हा अनुभव किती सुखद आहे याबद्दल सांगितलंय.