
छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी हिने 'जुळून येति रेशीमगाठी' या मालिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती एक उत्कृष्ट लेखिका देखील आहे. तर परेश मोकाशी याच्यासोबत मिळून तिने अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केलीये. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने निर्मात्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं आहे. शिवाय कुठलाही मराठी निर्माता मुद्दाम तुमचे पैसे बुडवत नाही, असंही ती म्हणालीये.