
'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आई कशी असते याचा आदर्श तिने अरुंधती बनून घातला. काहीच दिवसात अरुंधती सगळ्यांची लाडकी बनली. तिने मालिकाच नाही तर नाटकातही काम केलंय. शिवाय ती उत्तम कविता करते आणि कविता सादरही करते. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम व्यक्ती आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिला स्वयंपाक येत नाही म्हणून हिणवलं गेल्याच सांगितलंय.