
'आई कुठे काय करते' मधून घराघरात पोहोचलेली सगळ्यांची लाडकी अरुंधती म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. या मालिकेने मधुराणीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते. तिने साकारलेली अरुंधती इतर कुणीही तितकी चांगल्या पद्धतीने साकारू शकलं नसतं. आता मधुराणीने नुकतीच दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. यात तिने लग्नसंस्थेवर भाष्य केलंय.