
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' गेली पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. अखेर ३० नोव्हेंबर रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अरुंधती या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आई घरात काहीच करत नाही हा समज या मालिकेने मोडून काढला. आई नसेल तर घर उभंच राहू शकत नाही हे दाखवणारी मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' पुढे मालिका जरी भरकटली असली तरी अनेक स्त्रियांसाठी ही मालिका प्रेरणा ठरली. अशातच या मालिकेने निरोप घेतला मात्र आता मधुराणीने पार्ट २ वर देखील भाष्य केलंय.