
Madhurani Prabhulkar On Shooting With Ashok Saraf: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. ही मालिका कायम टॉप ३ मध्ये राहिली. आता मात्र ही मालिका प्रेक्षकांना फारशी पसंत नसली तरी मधुराणीवरचं चाहत्यांचं प्रेम मुळीच कमी झालेलं नाही. जेव्हा मधुराणी पहिल्यांदा 'आई कुठे काय करते' मध्ये दिसली होती. तेव्हा अनेकांनी तिला 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखलं होतं. या चित्रपटात ब्रशचा माईक घेऊन व्हीजेची भूमिका करणारी तूच का असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिच्या त्या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
आता 'नवरा माझा नवसाचा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा अनेक स्वप्न उराशी घेऊन आले होते. त्यावेळी एक मालिका मी केली आणि मला लगेचच या चित्रपटात काम मिळालं. मी सचिन सरांकडे स्वतः गेले होते. त्यानंतर व्हीजे ही भूमिका मला मिळाली. त्या भूमिकेसाठी मी जे इंग्रजी बोलले अगदी तसंच माझ्या बहिणीची मुलगी बोलायची. आणि ते कुठेतरी मी माझ्या भूमिकेसाठी वापरावं असं मला वाटलं. पहिल्याच दिवशी मी जेव्हा सीन दिला तेव्हा सचिन सरांना देखील ते आवडलं. आणि संपूर्ण चित्रपटात मी तिच भाषा बोलली आहे. माइक म्हणून मी जो हेअर ब्रश वापरला होता तो मी स्वतः दादर स्टेशनला जाऊन माझ्या हातात मावेल असा घेतला होता.'
पुढे मधुराणी म्हणाली, 'अशोक मामांच्या बाजूला बसून काम करणं म्हणजे मला फारच दडपण आलं होतं. लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत असताना त्यांच्यासोबत काम करणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. तरीही त्यांनी मला सांभाळून घेतलं. ज्यावेळी रीमा ताईंची एंट्री झाली तेव्हा मी यांच्याकडे बघतच बसले. किंवा सोनू निगम असेल. यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणं म्हणजे इंडस्ट्रीत येताच माझ्यापुढे पंचपक्वानांचं ताट वाढल्यासारखं झालं होतं. सुप्रिया ताई सचिन सर खूप सपोर्टिव्ह आहेत. ही भूमिका मला खूप काही देऊन गेलीये. ज्यावेळी 'आई कुठे काय करते' मालिका आली तेव्हा मीच नवरा माझा नवसाचा मधली व्हीजे आहे हे लोकांनी लगेच ओळखलं. 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये मी नाहीये पण यानिमित्ताने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.